श्री अनिल वामोरकर
कवितेचा उत्सव
☆ देऊन तर पहा… ☆ श्री अनिल वामोरकर ☆
☆
भविष्याचे चित्र रंगवा,
मात्र
वर्तमानात जगताना भूतकाळ विसरून जा,
आणि भविष्य उज्वल करण्याच्या नादात,
स्वतःला मात्र विसरून जाऊ नका.
कायम
मागत राहण्यापेक्षा कधीतरी
देऊन तर पहा…
मागण्याच्या लाचारी पेक्षा, दातृत्वाने मिळणारा आत्मानंद तर पहा…
जीवनातल्या आघाड्यावर हरल्यावर,
एकटं पश्चात्तापात जळण्यापेक्षा, मित्रांच्या खांद्यावर आपलं डोकं
ठेवून तर पहा…
मित्राच्या मायेच्या स्पर्शाने, मनातले वादळ कसे शांत होते ते तर पहा…
आपल्याला काय हवय?
पेक्षा कोणाला आपली गरज आहे का? हे तर पहा… विष्णूला तुळस प्रिय,
शिवाला बेलप्रिय आपल्याजवळ जे आहे ते देण्यापेक्षा त्याला काय हवे ते देण्यातच खरा आनंद आहे
देऊन तर पहा…
☆
© श्री अनिल वामोरकर
अमरावती
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






जपण्यासारखे, मनन करण्यासारखे व अंमलात आणण्यासाठी प्रयत्नरत असणे .
अ. ल . देशपांडे, अमरावती.