सौ. ज्योती कुळकर्णी 

? कवितेचा उत्सव ?

☆ आश्रम☆ सौ. ज्योती कुळकर्णी ☆  

(अनलज्वाला – ८/८/८)

परंपरेने चालत आले चारी आश्रम

नव्या युगाची नवी कमाई का वृद्धाश्रम?

*

नव युगातले नवे स्विकारत पुढेच जावे

तुम्ही शोधले मूल ठेवण्या मग बालाश्रम

*

दाखविती ही मुले तुम्हाला जर वृद्धाश्रम

तुमचे घर जर, तुम्ही दाखवा यौवन आश्रम

*

वीट कुठे हो तुम्हास आला संसाराचा?

नुसते बोलू नका तुम्ही घ्या संन्यासाश्रम!

*

पिढी नवी का घडवायाची तुम्हास येथे?

येथेच तुम्ही निर्माण करा मग कष्टाश्रम

© सौ. ज्योती कुळकर्णी

अकोला

मोबा. नं. ९८२२१०९६२४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments