प्राची अभय जोशी

? कवितेचा उत्सव ?

☆ नाते असावे असे… ☆ प्राची अभय जोशी ☆

माती आणि दगडाचे

असे आगळे वेगळे नाते

सृष्टी मात्र दोघांनाही

स्वतः सारखेच जपते.

 

पहिल्या पावसाची माती

ओला सुगंध पसरवते

दगड भिजतो तेंव्हा मात्र

त्याला लकाकी येते

 

पावसातील माती ही

अवखळपणे वाहते अन्

दगडाचे दिसून येते

एकाच जागी स्थिरावणे.

 

माती आणि दगडाचे हे

प्रतिक आहे भावनांचे

प्रत्येक वेळी विरघळताना

असे स्थिरतेने पाहणे

 

दोघांकडेही पाहताना वाटे असे सारखे,

दगडाचे फक्त पाण्यात भिजणे…

अन्

मातीचे अगदी निरागसतेने विरघळणे…

 

भिजणे आणि विरघळणे जणू

हे असे निसर्गाचे सांगणे

या मानवाचे,

एकमेकांचे असे होऊ शकते का

स्वच्छ आणि नितळ नाते ?

©  प्राची अभय जोशी

मो 9822065666 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments