श्री अनिल वामोरकर
कवितेचा उत्सव
☆ हेचि दान देगा देवा… ☆ श्री अनिल वामोरकर ☆
☆
पाहीले मी
एक स्वप्न नवे
दूर गवताचे हिरवेगार,
गालीचे होते पसरले…
नदी नाले
ओसंडून वाहत होते,
नाद खळाळत्या पाण्याचा
कानात घुमतो आहे..
प्रत्येकाच्या
होते सुहास्य वदनी,
मतमतांतरे होती
मन भिन्नता मात्र नव्हती..
नव्हते कुणाच्याही
मनात जातीपातीचे किल्मिषे
धार्मिक सण साजरी होई
उत्साने, आनंदाने..
स्वप्नात पाहीले
ते सत्यात उतरु दे
राहू दे गुण्यागोविंदाने
देवा हेचि दान दे…
☆
© श्री अनिल वामोरकर
अमरावती
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





