मंजुषा सुनीत मुळे

? कवितेचा उत्सव ?

☆ “क्षण…” ☆  मंजुषा सुनीत मुळे  ☆

*

व्यस्त व्यग्र दिवसातले

मोजकेच निसटते पण मोहक क्षण

भेटतात मला न चुकता

चोरून भेटणाऱ्या प्रेयसीसारखे – –

 

आसाभोवती फिरणाऱ्या चाकासारखं

आयुष्याला जखडून फिरतांना

मनाची झीज थोपवायला

धावून येतात हे क्षण .. वंगणासारखे – –

 

चहूबाजूंनी मनावर कोसळू पहाणारा

आघातांचा बेभान पाऊस

निश्चलतेच्या गोवर्धनावर थोपवण्यासाठी

पुरतात हे क्षण .. कृष्णाच्या करंगळीसारखे – –

 

उदास निराश काळोखात

अंदाजानेच चाचपडतांना

हळूच वाट दाखवतात हे

आशेचे प्रकाशकण होऊन .. काजव्यांसारखे – – 

 

नकळत पहाते वाट मी

या संजीवक अनमोल क्षणांची

जेव्हा उरते फक्त मीपणच माझे

वादळवाऱ्यात एकाट देवळात .. .. 

मिणमिणणाऱ्या पणतीसारखे – – –

© मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

1 Comment
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
सौ.ज्योती कुळकर्णी.
0

खूप सुंदर कविता मंजूषाताई