अर्चना गादीकर निकारंगे
कवितेचा उत्सव
☆ विचारणा… ☆ अर्चना गादीकर निकारंगे ☆
☆
हळूच विचारले मनाला, ” भावले का तुला? “
विलंब न करता उत्तरले, ” प्रश्न हा का झाला? “
म्हटले, ” किती सुंदर वाटतोय निसर्ग हा! “
बोलते झाले, ” अशीच नेहमी अवलोकीत राहा. “
*
थंडगार वार्याची झुळूक, पक्ष्यांचे मधुर बोल,
हे भावत असते मनात खूप खोल.
सुंदर हे वातावरण प्रसन्न करते मनास,
पहावे त्याला रोज ह्रदयी असतो एक ध्यास.
*
साधेसुधे असे हे प्रसंंग आनंद देतात,
पाहताच त्यांना नकळत मनाचा ताबा घेतात.
निस्वार्थी भावनेने निसर्ग रोज देत असतो,
परतफेडीचा प्रश्न तिथे अस्तित्वात नसतो.
☆
© अर्चना गादीकर निकारंगे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




