प्रा. भरत खैरकर
कवितेचा उत्सव
☆ भूलभुलैय्या… ☆ प्रा. भरत खैरकर ☆
☆
खेळ संचिताचा जाणीयाला कोणी
भविष्याच्या पाटीवरी आपापली कहाणी!
*
कवटाळावे कवेत स्वप्नांचे आकाश
भरारतांना पंखात असावा धरेचा फास!
*
वेदनांची वर्दळ वाढता उरात दुःख घ्यावे
सांत्वनांच्या हातांनी हलके हलके थोपटावे
*
आपणास फशी पाडतो नियंत्याचा भुलभुलय्या
पुण्याचा साठा करण्यात झिजवावी आपली काया!
☆
© प्रा. भरत खैरकर
संपर्क – बी १/७, काकडे पार्क, तानाजी नगर, चिंचवड, पुणे ३३. मो. ९८८१६१५३२९
≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






