श्री शरद कुलकर्णी

? कवितेचा उत्सव ?

☆ गाणे… ☆ श्री शरद कुलकर्णी ☆

गाणे जे ह्रदयातून

मग कंठातून

आणि ओठातून येते.

देहातून देहाचे होते.

देह गाण्याचे देहभान विसरते.

रक्तातून शब्दशब्द वाहते.

नि:शब्द करते

कधीकधी नीरवतेचे आक्रोश होते.

संयमाचे काठ मनाचे सांभाळीत

धीर होउन नदीच होते.

देहातून, रक्तातून, मनातून

पापणी पाशी थेंब होउन येते.

शहाणे होउन मग ते

बंद डोळ्यात राहते.

गाणे हे असेच असावे

गाणे हे असेच असते.

 

© श्री शरद  कुलकर्णी

मिरज

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted