उज्वला सुहास सहस्रबुद्धे

☆ पाऊस… ☆ उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

 वाट पाहते पागोळीची,

 छपरावरून येईल कधी!

टप् टप् टप् टप् ध्वनी त्याचा,

 कानामध्ये घुमेल कधी? …

 मृग नक्षत्राची चाहूल लागली,

 पण येणे तुझे झाले नाही!

पावसा पावसा ये लवकर,

 तुजविण आमचे जीवन नाही! … २

 *

येतोस जेव्हा तू भरभरून,

 कळत नाही आम्हा किंमत तुझी!

 तुझ्या विना जेव्हा जगतो आम्ही,

 विरहातून जाणीव होई तुझी! … ३

 *

ऋतुचक्राच्या फेऱ्यामधले,

 तुझेच आहे मोठे स्थान!

 तू आलास तर ऐकणार आम्ही,

 तुझे मधुर ते निसर्ग गान! .. ४

© उज्वला सुहास सहस्रबुद्धे

वारजे 

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted