श्री विनायक कुलकर्णी
कवितेचा उत्सव
☆ केवळ नावापुरती… ☆ श्री विनायक कुलकर्णी ☆
☆
केवळ नावापुरती आहे इथली समता
गब्बर झाला नेता आणिक दुबळी जनता
*
सन्मानांच्या पदकासाठी लागेबांधे
गुणवंतांची झाली गोची असून क्षमता
*
शिकावयाला गेला मुलगा तिथेच रमला
पालनपोषण करून थकली वेडी ममता
*
छाती काढुन पुढे निघाले लबाड सारे
सत्यवान तर हरेक इथला झाला नमता
*
साव जाहला बदनामी अन् चोर गाजला
का झोलांची वाढत आहे नुसती घनता
☆
© श्री विनायक कुलकर्णी
☎️86000 81092
≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




