उज्वला सुहास सहस्रबुद्धे
☆ वारी… ☆ उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆
☆
वारी आली वारी आली,
विठ्ठलाच्या दारी आली!
ज्ञानोबा-तुकयाची वारी,
वाखरीस भेट झाली! … १
*
भक्तमेळा सारा गोळा,
जीव पंढरी रमला!
विठ्ठल जयघोषात,
वारकरी दंग झाला! … २
*
चंद्रभागा स्नान करी,
वाळवंटी केली दाटी!
पुण्य स्नान नदीकाठी,
विठू उभा भक्तांसाठी! .. ३
*
अबीर, गुलाल, बुक्का,
पडे सडा चोहीकडे!
केशरी पताका माळा,
मार्गावर चोहीकडे! … ४
*
भक्त मेळा सारा गोळा,
जीव पंढरी रमला!
विठ्ठल जयघोषात,
वारकरी दंग झाला! … ५
*
चंद्रभागा स्नान करी,
वाळवंटी केली दाटी!
पुण्यभाव दिसे काठी,
विठू उभा भक्तांसाठी! . ६
☆
© उज्वला सुहास सहस्रबुद्धे
वारजे
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





