श्री सुहास रघुनाथ पंडित

? कवितेचा उत्सव ?

☆ हे श्रावणा... ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

☆

हे श्रावणा, मनभावना, शब्द माझे ऐक ना

मोहविते रुप तुझे, तूच का रे कृष्ण कान्हा

* 

डुलशी पाचूतुनी तू, स्त्रवशी धारेतुनी तू

पानातुनी, रानातुनी, दिसशी मला तूच तू

 *

किरण होशी कोवळे पांघरिशी मेघमाला

बासरीचा सूर येतो वाहताना रानवारा

 *

या फुलांचा गंध आणि लाभले रुप तुजला

पक्षीगण हे धावले गीत तुझे गावयाला

 *

जातसे रंगुनी मी हे रंग सारे पाहताना

घालीशी अन् मोहिनी तू लोभविसी या मना

हे श्रावणा… मन भावना

 ☆

© श्री सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted