श्रीशैल चौगुले
कवितेचा उत्सव
☆ प्रज्ञासुख… ☆ श्रीशैल चौगुले ☆
☆
पाटीवरच्या रेघोट्यांची
अक्षरे होऊ लागली
शब्दांनी घेऊन वेग
विवेकी धाऊ लागली.
*
आकारात ज्ञान आकृती
कवणी फुलू लागली
घडता-चडता प्रतिभा
जीवना पेलू लागली.
*
पाटीचे पुस्तक होताना
सरस्वती प्रसन्न झाली
ग्रंथाची सोबत बोलकी
प्रज्ञेच्या सुखात न्हाली.
☆
© श्रीशैल चौगुले
मो. ९६७३०१२०९०.
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




