श्री अनिल वामोरकर
कवितेचा उत्सव
☆ ऐवज… ☆ श्री अनिल वामोरकर ☆
☆
लपवून ठेवला आहे
ऐवज मी माझा
चोरुन नेईल ना कुणी
तो आहे माझिया हृदयात…
ह्या ऐवजाने
झालो मी गर्भ श्रीमंत
मात्र शून्य किंमत आहे
जगाच्या व्यवहारात…
ह्य ऐवजाने
बदलली दशा नी दिशा
ऐहीक सुख तूच्छ वाटे
रमतो मी शाश्वतात…
ह्या ऐवजाने
तमाची रात्र संपविली, येता ज्ञानकिरण एक,
दिसे स्पष्ट अंतरात..
☆
© श्री अनिल वामोरकर
अमरावती
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈


