नीलांबरी शिर्के
कवितेचा उत्सव
☆ देहाचा विस्तार… ☆ नीलांबरी शिर्के ☆
☆
आपसुक झाला
देहाचा विस्तार
पोरे नातवंडे
आपुलीच!!
विस्तारेला येता
वेगळे अस्तित्व
जोडणारा धागा
तुटतोच!!
दुरावा येताच
जीव तळमळे
दुःख कशापाई
उगाचच!!
प्रत्येक विस्तारा
चैतन्य वेगळे
वेगळाले जग
होणारच!!
अलिप्त रहाणे
अवघड होतसे
परंतु होणे हे
गरजेचच!!
☆
© सुश्री नीलांबरी शिर्के
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /मंजुषा मुळे/गौरी गाडेकर≈




