श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # ३४६ ?

☆ मधुचंद्राची रात … ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

☆

स्पष्ट बोल तू नकोच बोलू येथे मोघम

प्रवासातही तुझीच सोबत असेल कायम

*

विहीर आहे खोल आपली कायम पाणी

बारा महिने शेती पिकवू असाच मोसम

*

या गाण्याचे बोल एवढे मिठास आहे

धुंद तराणे गाऊ आपण सुरात सरगम

*

ऊब नशा ह्या दोन्ही गोष्टी तिच्यात असता

त्याच्यासाठी सांग कशाला घेऊ मी रम

*

मधुचंद्राची रात आपली मस्त दिवानी

मोगऱ्यातली कळी तुझीही खुलेल उत्तम

*

सूप लांबचा पल्ला होता तिने गाठला

महासागरी आज नदीचा झाला संगम

*

नकोय सत्ता प्रेम दिसावे दोघांमधले

दोघांपैकी नकोच कोणी येथे दुय्यम

☆

 © अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

ashokbhambure123@gmail.com

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted