सौ. पल्लवी ऋषिकेश कुलकर्णी

परिचय 

नाव : – सौ . पल्लवी ऋषिकेश कुलकर्णी

शिक्षण : – बी कॉम, ए.टी.डी., आर्ट मास्टर

आवड : – कविता करणे, वेगवेगळ्या विषयांवर लेख लिहिणे . वाचन आणि पर्यटन

नोकरी : –  CBSE स्कुल मध्ये ड्रॉईंग टिचर म्हणुन सहा वर्ष कार्यरत आहे .

कार्यशाळा : – कॅनव्हास पेंटीग, ओरिगामी, फ्लुएड आर्ट, क्राफ्ट वर्क पोत निर्मिती, बांधणी वर्क अशा अनेक कार्यशाळा मी घेते .

फ्लुएड आर्ट : – यामध्ये ॲक्रॅलिक कलर्स वापरून कॅनव्हासवर पेंटीग केले जाते . याचे पुर्ण किट मिळते.

कॅनव्हास पेंटींग : – यामध्ये ॲक्रॉलिक, ऑईल कलर्स चा वापर करून पेंटीग केले जाते.

ओरिगामी : यामध्ये पेपर च्या घड्या घालुन कागदापासून कलाकृती साकारली जाते .

बांधणी वर्क : बांधणी वर्क च्या कार्यशाळे मध्ये वेगवेगळ्या प्रकारे बांधणीचे प्रकार शिकवले जातात . यामध्ये कापडावर बांधणी प्रिंट शिकवले जाते.

क्राफ्ट वर्क : –  यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची फुले पेपर पासून, कापडापासून बनविण्यास शिकविली जातात . तसेच नॅपकिन पासुन फुले व त्याचा बुके बनविण्याचे प्रशिक्षण दिले जाते. लहान मुलांसाठी क्लेपासुन छोट्या छोट्या कलाकृती करण्यास शिकविले जाते.

व्हेजिटेबल, फ्रुट कार्व्हिंग : – फुले, पाने, पक्षी हे व्हेजिटेबल फ्रुट पासुन कार्व्ह करायला शिकविले जाते.

? कवितेचा उत्सव ?

☆ माझी कविता ☆ सौ. पल्लवी ऋषिकेश कुलकर्णी ☆

सांधत गेले बांधत गेले

शब्दांना या रांधत गेले . . . .१

 

आंबट गोड चविच्या संगे

शब्दांना त्यात मुरवत गेले

कधी हसूनी कधी रुसूनी

शब्दांना मी रुजवत गेले

सांधत गेले बांधत गेले  . . . .२

 

मोहरीपरी तडतड उडले

लाह्यांसंगे अलगद फुलले

पाण्यासंगे संथ विहरले

शब्दांचे जणू रंग बदलले

सांधत गेले बांधत गेले  . . . .३

 

चांदीच्या त्या ताटांमधुनी

पानांच्याही द्रोणांमधुनी

कधी अलवार ओंजळीतही

शब्दांना परी मांडत गेले

सांधत गेले बांधत गेले  . . . .४

 

महिरपीतल्या नक्षीमधले

चित्रावतीच्या थेंबामधले

आचमनाच्या उदकामधले

शब्दांना मी सजवत गेले

सांधत गेले बांधत गेले  . . . .५

 

तिखटपणाने कधी खटकले

खारे शब्दची नाही रुचले

दोघांमधली दरी संपता

पंक्तीमधुनी सजुनी गेले

सांधत गेले बांधत गेले  . . . .६

 

मुखवासासम ते पाझरले

मुखातुनी या हास्य उमटले

जीवन माझे शब्दची झाले

कवितेचे ते कोंदण ल्याले

सांधत गेले बांधत गेले  . . . .७

 

© सौ. पल्लवी ऋषिकेश कुलकर्णी 

 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
2.5 2 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

3 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
ज्ञानेश्वर भिसे.. कोल्हापूर..
0

जीवन माझे शब्दची झाले

कवितेचे ते कोंदण ल्याले…
फारच सुंदर..

Rupali pushpak pandharbale
0

Congratulations aaisaheb….so nice and meaningful poem….

Hemant Shah
0

Very nice poem…. pallavi