सुश्री नीलांबरी शिर्के
चित्रकाव्य
असाही ‘रिंगण सोहळा’
सुश्री नीलांबरी शिर्के ☆
☆
वारकऱ्यांच्या मार्गावरती
भक्तिमय रिंगण सोहळा
गरीब श्रीमंत लहान मोठे
रिंगणास या होती गोळा
*
गाड्यांचे चौकातील रिंगण
पोटोबाचा असे सोहळा
प्रत्येकाची मंदिरे वेगळी
प्रत्येकाचा रथ आगळा
*
ध्येय मंदिर गाठायाची
सगळ्यांना असते घाई
टाळ मृदुंगासम रिंगणी
पें पें पों पों हाॅर्न गजर होई
*
विठ्ठल विठ्ठल ओठ बोलती
पोटोबांची मस्तकी गणती
पोटोबासह विठू बोलतो
तालावरती भक्त नाचती
☆
© सुश्री नीलांबरी शिर्के
मो 8149144177
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





