सौ. रेणुका धनंजय मार्डीकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? कामलता ही कामिनी भासे ? सौ.रेणुका धनंजय मार्डीकर ☆

(वृत्त: पादाकुलक)

रुपडे सुंदर कांती कोमल

मनास माझ्या ओढ लावते

पहा उतरले धरणीवरती

तारांगण हे मला भावते

कुंजलता ही बहरत आली 

इकडे तिकडे वळणे घाली

कोवळ कांती सुमंगलाही 

कुमकुम टिकली अंगी ल्याली

*

कामलता ही कामिनी भासे

मोहक सुंदर किती देखणी

लटका बांधा अन् शेलाटी

ललना भासे लावण्यखणी 

*

कामिनी कुणी म्हणे तरुलता 

जयंती फूल अत्तर दाता

गजाननाच्या किरिटी साजे

झिरमिर झिरमिर पल्लव पाता

*

हरित पिसारा त्यात जणू ही

लाल चांदणी उमलत येते

गणेशवेली प्रिय साऱ्यांची 

मनास माझ्या मोदच देते 

*

भिरभिर भिरभिर शब्द फिरावे

कविता सुमने त्यात फुलावी

लाल तारका काशीरत्नम्

हिंदोळ्यावर गोड झुलावी

*

© सौ.रेणुका धनंजय मार्डीकर

औसा.

मोबा. नं.  ८८५५९१७९१८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments