श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? ज्याचे त्याचे स्थान ? श्री आशिष  बिवलकर ☆

मृदूंग वाजतो मंदिरात,

खेटरं गांजती पायरीशी.

जरी चर्म दोन्ही अंगी,

कर्म ज्याचे त्याच्यापाशी.

*
मृदूंग मिरवती गळ्यात,

पायताणं घासती पायात.

दोष ना तो चामड्याचा,

जडणं घडणं जैसे भाग्यात.

*
मृदंग देई भजनात साथ,

खेटरं सोसती भार लाथ.

योग्यता ठरवी चामड्याची,

घडवणाऱ्याचे दोन हात.

*
मृदूंग दुमदुमतो ताल,

खेटरं करकरतो चाल.

उमटणारा ध्वनी सांगे,

दोघांच्या अंतरीचे हाल.

*
कातडं जरी साम्य दोघांत,

कारागीर गुरु बाणवतो मोल.

जैसा गुरु मिळे भाग्यात,

तैसा साधती जीवनाचा तोल.

*
मृदूंग घडावा वा वाहणा,

ज्याचे त्याचे असते स्थान.

गुरु, कर्म आणि भाग्य देते,

जीवनात यथोचित सन्मान.

©️ वास्तवरंग

(चित्र सौजन्य – श्री आशिष बिवलकर) 

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments