सुश्री वर्षा बालगोपाल
चित्रकाव्य
आता थांबायचं नाही…
सुश्री वर्षा बालगोपाल ☆
☆
कोणी टाकले दगड वाटेत
अडथळे उभे अडवायला ||
पाहिले उंच त्या आकाशाकडे
निर्मीत वाट लागे चालायला ||
*
धारेची मग मी झाले ओहोळ
अडथळ्यांना वळसे घालून ||
कपारीवरून झोकून दिले
मिरवले मग झरा होऊन ||
*
कितीतरी ते खड्डे बुजवले
कितीतरी गं काठ सजवले||
माझ्यासंगे ‘जीवन’ फुलवीत
सरीता झाले वाहत राहिले||
*
पुढे जायचा घेतला वसा मी
कुठेच आता थांबायचं नाय||
सागर होऊन दाखविणार
ध्येय मार्ग जरी दुर्गम हाय||
☆
© सुश्री वर्षा बालगोपाल
मो 9923400506
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






