सौ. रेणुका धनंजय मार्डीकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? वैशाखात अग्निपुष्प ? सौ.रेणुका धनंजय मार्डीकर ☆

(भावगीत – वर्ण संख्या 16 यती 8 व्या अक्षरावर) 

केशरांगी बहरल्या तेजोमय पलाशाला 

वैशाखात अग्निपुष्प भासतात जणू ज्वाला ||ध्रु||

*
किती शिकावे शिकावे पळसाचे गुण घ्यावे 

ब्रह्मा विष्णू महेशाने येथे निवासाला यावे 

भेगाळल्या मातीवर बहर फुलांचा आला

वैशाखात अग्निपुष्प भासतात जणू ज्वाला ||1||

*
कधी भासतो तो मला ध्यानस्थ बसला योगी

रणरणतो भास्कर चटके पळस भोगी

वसंतवैभवातला किरिट पलाश झाला

वैशाखात अग्नीपुष्प भासतात जणू ज्वाला ||2||

*

कालीमाता सरस्वती यांच्या पूजेसाठी फुले

विदर्भात वापरती सान थोर आणि मुले

ढाक, टेसू, ब्रह्मपुष्प किती नावे पहा याला

वैशाखात अग्निपुष्प भासतात जणू ज्वाला ||3||

*
ऋतुसंहार हे नाव कालिदासांनी दिलेले

अर्धचंद्रकृती चोच पाकळ्यात वसलेले 

पुष्पे पाहूनच येती पक्षी क्रीडा करण्याला

वैशाखत अग्निपुष्प भासतात जणू झाला ||4||

*
बहुगुणी वैद्यराज शेतकऱ्याचा हा मित्र

सर्वमान्य भोजनास होते मान्य याचे पात्र

चोची पक्षाच्या भासती रंग कुसुंबी फुलाला 

वैशाखात अग्निपुष्प भासतात जणू ज्वाला ||5||

© सौ.रेणुका धनंजय मार्डीकर

औसा.

मोबा. नं.  ८८५५९१७९१८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments