सुश्री नीलांबरी शिर्के
चित्रकाव्य
एकच प्रार्थना…
सुश्री नीलांबरी शिर्के ☆
☆
शेंगेतले दोन दाणे जणू जुळे भाऊ
पांघरूण काढलं तरी म्हणतात
जरा झोपून घेऊ – –
झोप झाल्यावर न कळे.. भविष्य असेल काय !
कुणी कढईत कोणी खलबत्यात
कुटलं जाय !! – –
शेंगदाणा जाणतो .. नंतर होतं काय
एकच प्रार्थना मनोमनी की
एक तरी मातीत पेरलं जाय !! – –
☆
© सुश्री नीलांबरी शिर्के
मो 8149144177
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





