सुश्री ज्योत्स्ना तानवडे
चित्रकाव्य
– जगणे व्हावे मंगलगाणे – ☆ सुश्री ज्योत्स्ना तानवडे ☆
☆
दगडांच्या फटीत मिळाली
जागा त्या बीजाला रुजायला
आनंदाने तिथेच रुजले
खुशीत लागले डुलायला ||
*
स्वधर्म नाही विसरले ते
रुजणे आणि फुलून येणे
क्षणिक जीवनाचे सार्थक
सौंदर्यासह सुगंध देणे ||
*
इवलासा जीव शिकवतो
परिस्थितीवर मात करा
जगणे व्हावे मंगल गाणे
देवऋणाला सदैव स्मरा ||
*
प्रतिकुलता नको निराशा
सर्वस्वाने लढत रहावे
जिद्द शेवटी फळास येते
इवल्या बिजा अनुसरावे ||
☆
© सौ.ज्योत्स्ना तानवडे
वारजे, पुणे.५८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈







