सुश्री वर्षा बालगोपाल
चित्रकाव्य
अनोखी प्रेमकहाणी…
सुश्री वर्षा बालगोपाल ☆
☆
किती हिरवाईने सजली पायवाट
कधी सरळसोट कधी कठीण घाट
*
तिला खुणावे तो रहदारीचा रस्ता
जिथे गलबलाट अन गोंगाट नुसता
*
भूल पडली मग भोळ्या पायवाटेला
गळामीठी घालू त्या हमरस्त्याला
*
रस्त्यालाही आकर्षण त्या पायवाटेचे
मनात असूनही पाय वळले ना त्याचे
*
भोळी पायवाट मिलना आतुरली
काट्या कुट्यातून चढ उतारांनी धावत सुटली
*
दिसताच हमरस्ता बहु आनंदली
आतुरतेने घट्ट मीठी त्यास घातली
*
क्षणिक मिलन त्यांचे वाट सुखावली
रस्त्यास ना वेळ लगेच पुढे धाव हो घेतली
*
वेडी पायवाट तिथे स्तब्ध झाली
तिथे त्याची वाट पहात राहिली
*
पायवाट हमरस्त्याची अनोखी प्रेम कहाणी
सांगते सकल जना ही प्रेम दिवाणी
☆
© सुश्री वर्षा बालगोपाल
मो 9923400506
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






