श्री सुहास रघुनाथ पंडित
चित्रकाव्य
“पानगळ” – कवी : श्री राहुल लाळे
☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆
☆
पानगळ जरी झाली
तरीही झाड परत बहरते…
*
फुलंफळं लुटली जाऊनही
खोडाला पुन्हा पालवी फुटते…
*
आपणही का नाही मग झाड व्हावं?
*
आप्तजनांची पानं गळता
हुंदके गिळून नवा बहर ल्यावा…
*
आशेची पालवी नेसावी
आठवणीतून नवस्वप्ने पहावी
*
छायेत आपल्या इतरांनाही सावली द्यावी
सारी दुनिया खुलवून टाकावी…
☆
कवी : श्री राहुल लाळे
प्रस्तुती : श्री सुहास रघुनाथ पंडित
सांगली (महाराष्ट्र)
मो – 9421225491
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





