रेणुका धनंजय मार्डीकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? चांदणीचे रूप हिचे… ? रेणुका धनंजय मार्डीकर ☆

(वर्णसंख्या सोळा, यती आठव्या अक्षक्षरावर)

(भावगीत)

येता बकुळ फुलोरा सुगंधाची मांदियाळी 

गंध वारा पिंगा देतो ओघळती सायंकाळी ||ध्रु||

*

मन जाते माझे तेथे ताटव्यात सुगंधाच्या 

किती देखणे लावण्य ओटी मध्ये  वसंताच्या

कोणी इळन्नी म्हणती कोणी म्हणती बकुळी 

गंध वारा पिंगा देतो ओघळती सायंकाळी ||१||

*

कधी ओवळ होऊन वेळेसरात गुंफले

कुंतलास गंधाळतं दान त्याने हो शिंपले

फुले उमलु येताना गोड मधुकण गाळी 

गंधवारा पिंगा देतो ओघळती सायंकाळी ||२||

*

कवितेचे शब्द झाली लावणीला शोभा आली

कोणी रमणी देखणी बकुळीचा साज ल्याली  

चांदणीचे रूप हिचे तारकांची हो झळाळी

गंध वारा पिंगा देतो ओघळती सायंकाळी ||३||

*

हिच्या सुगंधाची भूल मनाला लागले  पिसे

बरसोळी ओघळता हिमवर्षावच दिसे

बासरीची धून गातो गोकुळचा वनमाळी

गंध वारा पिंगा देतो ओघळती सायंकाळी ||४||

*

बकुळीच्या गंधकोशी अत्तराचा फाया झाला

सा रे ग म प ध नी सा स्वर माझा आला आला 

बकुळीची गोड बिंदी लावली मी काव्यभाळी

गंध वारा पिंगा देतो ओघळती सायंकाळी ||५||

© रेणुका धनंजय मार्डीकर

औसा.

मोबा. नं.  ८८५५९१७९१८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments