सुश्री नीलांबरी शिर्के
चित्रकाव्य
नाळ धरतीशी !!
सुश्री नीलांबरी शिर्के ☆
☆
किती कापा कसेही तोडा
आपसूक झाडा येई फुटवा
जोवर गच्च नाळ धरतीशी
तोवर वृक्ष नित राही हिरवा!!
*
तीच भरविते घास मुखी अन्
मुळातुनी वाढ म्हणुनी ऊर्जा
मातीमायच खतपाणी देऊनी
म्हणते निसर्ग समतोल राख जा!!
*
सकला देतो सावली नीत्य मी
फळे, फुले, चाराही पुरवितो
तरीही का ही कुऱ्हाड देहावर
प्रश्न मला नित छळत राहतो!!
☆
© सुश्री नीलांबरी शिर्के
मो 8149144177
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





