श्री प्रमोद वामन वर्तक  

?️?  चित्रकाव्य  ?️?

? तयारी आगमनाची ?  श्री प्रमोद वामन वर्तक ☆

कर या कलाकारांचे 

रंगविती गणेशाला

जो रंगभरी चराचरी 

धरून अदृश्य कुंचला

*

कळस सदृश्य मुकुट 

केला धारण शिरावर 

गंध नाजूक नजाकतीने 

शोभे भव्य भाळावर

*

बलदंड बाहू तयांचे 

त्यात वाकी शोभे छान 

सुपासारख्या कानाखाली 

गोल गरगरीत मान

*

शुभ्र सुळ्यांच्या मधुनी 

वेलांटी मारे गोड सोंड 

धूत वस्त्रामधून ओसंडे 

गोल गरगरीत दोंद

*

वाट पाहती भक्तजन 

प्राण आणून डोळ्यात 

होता आगमन विघ्नेशाचे 

मोद पसरेल घरात

मोद पसरेल घरात

© प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) 400610 

मो – 9892561086 ई-मेल – pradnyavartak3@gmail.com

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted