नीलांबरी शिर्के
चित्रकाव्य
☆ फुले बागेतली… ☆ नीलांबरी शिर्के ☆
☆
फुले बागेतली
रंग गंध ल्याली
पावसात न्हाली
मनसोक्त?!
*
फुले बागेतली
परडीत आली
चरणी बैसली
देवाचिया?!
*
फुले बागेतली
उद्या सुकतील
निर्माल्य होतील
आपोआप?!
*
बागेतल्या फुला
अल्पसे जीवन
तरी दरवळून
जात असे?!
☆
© सुश्री नीलांबरी शिर्के
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /मंजुषा मुळे/गौरी गाडेकर≈







……….तरी दरवळून
जातसे आसमंत !