श्री प्रमोद वामन वर्तक
चित्रकाव्य
अनमोल जीव!
श्री प्रमोद वामन वर्तक ☆
☆
कानी कपाळी ओरडल्याने
काही फरक पडला नाही
पण काल रूळ ओलांडतांना
यमराजाने धरली बाही
*
रूळ क्रॉस करणे म्हणजे
दंडनीय अपराध म्हणाला
अटक केली आहे तुम्हाला
आता गुपचूप चौकीवर चला
*
“दंड करा अटक करा
आम्ही नाही ऐकणार
एवढं वजन कॅरी करून
गर्दीत ब्रिज कसा चढणार? “
*
अरे गाडीखाली गेलात तर
पोरा बाळांचे काय होईल?
असतील म्हातारे आई बाप
त्यांच्याकडे कोण पाहिल?
*
ब्रिजचा उपयोग प्रवाशांनी
रूळ ओलांडतांना करावा
जीव असे अनमोल आपला
गाडीखाली कां घालवावा?
गाडीखाली कां घालवावा?
☆
© प्रमोद वामन वर्तक
संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) 400610
मो – 9892561086 ई-मेल – pradnyavartak3@gmail.com
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






