श्री नंदकुमार पंडित वडेर

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “दुडिया” – लेखक : श्री विश्वास पाटील ☆ परिचय – श्री नंदकुमार पंडित वडेर 

पुस्तक – दुडिया  

लेखक-विश्वास पाटील.

प्रकाशक-मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस.

पृष्ठ संख्या-१४७

पुस्तक मूल्य- रुपये-२००/

दुडिया या एका शरणार्थी नक्षलवादी तरुणीची कहाणी सांगणार्‍या या कादंबरीत नक्षलवादींच्या प्रश्नामागची उकल करून दाखवतात. यात त्यांची कार्यपध्दती, त्यांच्या नेत्यांची विचारसरणी आणि जीवनशैली, नक्षलवादानं देशापुढं उभा केलेला धोका, आदिवासिंची हलाखीची परिस्थिति, त्याचं सरकारी

कर्मचारी आणि नक्षलवादी यांनी कठीण केलेलं जीवन या सार्‍याचचं चित्र वाचकाच्या नजरेसमोर उभं करते.

विश्वास पाटील यांच्या छत्तीसगड भागातील सरकारी कामानिमिताने काही काळाच्या वास्तव्यात असताना त्यांच्या सराईत लेखणीनं नक्षलवादाचा प्रश्न किती गुंतागुंतीचा आहे आणि भयानक आहे, स्थानिक आदिवासीचं जीवन त्यानं कसं आणि किती व्यापून टाकलं आहे. त्यांचे आयुष्य अनिश्चिततेच्या भोवर्‍यात अडकलेल हे जग प्रत्ययकारक पध्दतीनं अनेक तपशिलांसह जिवंत केलं आहे. त्यामुळचं ही कादंबरी आपल्याला एका वेगळ्या जगात घेऊन जाते. वाचकाला अस्वस्थ करतानाच त्याला विचारात पाडते.

परिचय : श्री नंदकुमार इंदिरा पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –nandkumarpwader@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments