श्री नंदकुमार पंडित वडेर
पुस्तकावर बोलू काही
☆ “पैलतटावर” – लेखक : श्री विलास कोल्हे ☆ परिचय – श्री नंदकुमार पंडित वडेर ☆
पुस्तक – पैलतटावर
लेखक-विलास कोल्हे
प्रकाशक-मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस.
पृष्ठ संख्या-२०२.
पुस्तक मूल्य- रुपये-२५०/
ऐलतटावरून पैलतटावर गेलेल्या या सुहृदांच्या आठवणींचा, जन्म आणि मरण या दोन टोकांच्या मधल्या जीवनात या मंडळींनी किती आणि कसं काम केलं याचं चित्रचं. यात एकूण तेरा दिग्गजांच्या लेखातून साहित्याचा अभ्यास करण्यासाठी किती कष्ट करावे लागतात, प्रज्ञेला चिकाटीची जोड कशी द्यावी लागते हे उलगडत जाते.
एका अर्थानं हे लेख वाचणे हे आजच्या काळातल्या साहित्याच्या अभ्यासकांसाठी एक उत्तम प्रकारचे शिक्षणच आहे. मराठीमध्ये किती मोठ्ठ्या गुणवत्तेची माणसं बौध्दिक परिश्रम अहर्निश करत होती आणि त्यांनी मराठी समीक्षा-संशोधनाच्या क्षेत्रात काय काम करून ठेवलं आहे, आणि ते एकंदरीत मराठी साहित्याला कसं उपकारक आहे, याची जाणीव करून देणारे हे लेख आहेत.
हा संग्रह म्हणजे साहित्यक्षेत्रातील दिग्गजांच्या कार्याची आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाची ओळख करून देणारा .. वाचकाला अनेक अर्थानं समृध्द करणारा संग्रह आहे.
परिचय : श्री नंदकुमार इंदिरा पंडित वडेर
विश्रामबाग, सांगली
मोबाईल-99209 78470 ईमेल –nandkumarpwader@gmail.com
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈







