श्री हर्षल सुरेश भानुशाली

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “राजवंश भारती” – लेखक: ॲड सुशील अत्रे ☆ परिचय –  श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

पुस्तक : राजवंश भारती

लेखक: ॲड सुशील अत्रे

पृष्ठ: १५२ 

मूल्य: ८५०₹ 

एखादी गोष्ट जेव्हा वारंवार सांगितली जाते तेव्हा ती चुकीची असली तरी खरी वाटायला लागते अशी एक मानसशास्त्रीय धारणा आहे. आपल्याकडे तेच घडत गेले. भारतावर झालेली आक्रमणे आणि परकीयांनी केलेली हिंसा हाच इतिहास खरा वाटू लागला. कित्येक वर्षे आपण पराभूत मानसिकतेतच जगत आलो. आता भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे उलटून गेल्यावर सर्वसामान्य लोकांमध्ये जागरूकता निर्माण झाली आहे. इतिहासाचे संकलन, संशोधन करणाऱ्या संस्थांची दखल घेतली जाऊ लागली आहे.

प्रागैतिहास काळापासून म्हणजे.. ‘प्राचीन’ हा शब्दही अपुरा वाटावा, इतका प्राचीन इतिहास आपल्या देशाचा आहे. जगात बहुतेक ठिकाणी जेव्हा लोक रानटी टोळ्या म्हणून रहात होते, त्या काळी भारतात समृद्ध आणि संपन्न राजघराणी राज्य करीत होती. त्या राजवंशांबद्दल फारच थोडी माहिती आपल्याला उपलब्ध आहे. जी आहे, ती पाश्चात्य अभ्यासकांच्या ओंजळीतून मिळाली तरच स्वीकारायची अशी आपली मनोधारणा जी ब्रिटिशांनी करून ठेवली, ती अजूनही संपत नाही. शालेय शिक्षणात या इतिहासाचा अगदी ओझरता भाग शिकवला जातो. मोजके चिकित्सक विद्वान यावर जाडजूड शोधग्रंथ लिहितात, पण ते इतके क्लिष्ट होतात की आजच्या पिढीतील मुले तसे ग्रंथ हातात घेतच नाहीत. मग, आमचा देदीप्यमान इतिहास अज्ञानाच्या आणि उपेक्षेच्या पडद्याआड तसाच दडलेला राहून जातो. राजवंश भारती या पुस्तकात भारतातील निवडक अशा श्रेष्ठ राजवंशांची थोडक्यात आणि सचित्र माहिती दिली आहे आणि ती ही शक्य तितक्या सरळ-सोप्या भाषेत दिली आहे; जेणेकरून अगदी शाळकरी मुलांनाही ती आपलीशी वाटावी. आपल्या देशाविषयी सार्थ अन् साधार अभिमान नव्या पिढीला वाटावा, एवढाच उद्देश या पुस्तकाचा आहे.

प्रागैतिहास काळापासून म्हणजे मनूचे आगमन झाल्यापासून राजवंशाची माहिती आपल्याला या पुस्तकात वाचायला मिळेल. लेखक अॅड. सुशील अत्रे यांनी पराक्रमी अशा निवडक पन्नास राजवंशांचा परिचय या ग्रंथात करून दिला आहे.

 भारतात असे अनेक राजवंश झाले जे प्रदीर्घ काळ सत्तेवर होते, परंतु मुख्य प्रवाहातील इतिहासात त्यांची फारशी दखल घेतली गेली नाही (उदा. सुमारे १२ वर्षे वेगवेगळ्या भागात सत्तेवर असलेला ‘कलचुरी राजवंश’ किंवा दख्खनमधील ‘विष्णुकुंडिन राजवंश’) 

… अशा उपेक्षित व गौरवशाली राजघराण्यांचा इतिहास लेखकाने समोर आणला आहे

 

परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली

पालघर 

मो. 9619800030

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted