शालिनी जोशी
पुस्तकावर बोलू काही
☆ “जी-वन त्यांना कळले हो” – लेखक: डॉ. संदीप श्रोत्री ☆ परिचय – शालिनी जोशी ☆
पुस्तक : जी-वन त्यांना कळले हो
लेखक– डॉ. संदीप श्रोत्री, सातारा
प्रकाशक –विश्वकर्मा पब्लिकेशन्स, पुणे
प्रथम आवृत्ती डिसेंबर २०२५
मूल्य २७५ रुपये, पृष्ठ संख्या १८३.
लेखक स्वतः शल्यचिकित्सक असून सामाजिक कार्य करणारे आहेत. जगभर भ्रमंती करत निसर्गाशी एकरूप होणारे, निसर्गातील देवत्वाचा अनुभव घेतलेले, तसेच अभ्यासू संशोधक आहेत. पुस्तकाच्या रूपाने आपले अनुभव लोकांसमोर मांडणारे साहित्यकार, निसर्गप्रेमी आहेत. निसर्गाच्या अफाट संपत्ती पुढे ते नतमस्तक होतात. निसर्गालाच परमेश्वराचे रूप मानतात. सूर्य, प्राणी, पक्षी, डोंगर, दऱ्या, आकाश, चंद्र, चांदणे, झाडे, झुडपे, हे सारे निसर्ग देवतेचे अवयव असून त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी भारताबाहेर आफ्रिका, दक्षिण अमेरिका, केनिया, नेपाळ अशा विविध ठिकाणची जैवविविधता त्यांनी अनुभवली आहे. त्याचाच मी एक भाग आहे हा अनुभव पुन्हा पुन्हा घेतल्यामुळे निसर्ग आणि निसर्ग रक्षक यांच्याकडे ते आकर्षित होतात. म्हणून अशा निसर्गाच्या सानिध्यात जीव लावून काम करणाऱ्या भारतातील व बाहेरील महामानवांचा परिचय या पुस्तकात करून दिला आहे. हे सगळे प्राणी व पक्षांच्या सहवासात जंगलात राहून, त्यांच्यात मिसळून त्यांच्यासाठी काम करणारे आहेत. असामान्य व्यक्तींच्या योगदानाचा खजिनाच ते आपल्यासमोर ठेवतात.उदा–
१)उत्क्रांतीवादाचा सिद्धांत मांडणारे – डार्विन.
२) हिमालयातील वनस्पतींचा अभ्यास करणारे – सर जोफेस हूकर
३) भारतीय पक्षिशास्त्राचा पितामह –ऍलन ह्युम
४) आदिमानवाचा शोध घेणारा संशोधक–लुई विकेट
५) पक्षी अभ्यासक – सलीम अली
६) जंगलाचा माणूस – मारुती चितमपल्ली
७) खरे वनवासी दाम्पत्य – डॉ. प्रकाश व डॉ.मंदाकिनी आमटे
८) हत्तींची माता – सिंथिया माॅस
– – अशा वीस निसर्ग, पक्षी, प्राणी प्रेमिकांचे समर्पित जीवन आपल्या पुढे ठेवतात. ‘जीवन त्यांना कळले हो’ हे नाव सार्थ आहे.
परिचय : शालिनी जोशी
संपर्क – फ्लेट न .3 .राधाप्रिया टेरेसेस, समर्थपथ, प्रतिज्ञा मंगल कार्यालयाजवळ, कर्वेनगर, पुणे, 411052.
मोबाईल नं.—9850909383
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






