सुश्री संध्या बेडेकर
मनमंजुषेतून
☆ आमची आई ☆ सुश्री संध्या बेडेकर ☆
आमची ‘आई ‘म्हणजे एक प्रसन्नचित्त व्यक्तिमत्त्व. ••सर्वांचे लक्ष ठेवणारी.
‘आई ‘ या शब्दाची perfect ‘व्याख्या’ आणि ‘उदाहरण’ म्हणजे आमची ‘आई ‘. •• तिचे जग म्हणजे घर, मुल, नवरा. •• त्यात ती एवढी रमते की तिला व्यायामाला वेळच मिळत नाही. •असं तिचे म्हणणे असते. •• एक व्यायाम सोडला तर इतर कामे ती अगदी हुशारीने, आनंदाने, आवडीने, करण्यास तत्पर असते ••. फक्त थोडी दबक्या स्वभावाची आहे. •• त्यामुळे सर्वांशी पटत. •• पण तिच्या स्वभावाचा फायदा घेणारे बरेच असतात••. पटकन कोणाच्याही म्हणण्यात येते ••. कोणी काही म्हंटल तर लगेच त्याचा विचार करत बसते. हिरमुसते ••म्हणून आम्हाला तिच्या कडे लक्षच ठेवावे लागते •••. बरे असो..
खूप समजविल्यानंतर शेवटी नाईलाजाने का होईना पण ती आता सकाळी फिरायला जाऊ लागली. ••तिला आता आवडू ही लागल आहे. ••काल अचानक फिरून आल्यावर थोडी ‘disturb ‘वाटली. •• थोड्याच वेळात तिच्या बोलण्यातून लक्षात आले, की तिला शेजारच्या काकू भेटल्या होत्या. ••• ••लक्षात आलं काही तरी बोलण झाल असाव दोघींमधे. •• कळेलच. आई काही खूप वेळ मनात ठेवणार नाही. •••
थोड्या वेळात कळलेच सर्व.
शेजारच्या काकू म्हणजे अगदी regular walk, exercise करणाऱ्या. •• त्या आईला भेटल्या. •• तर लगेच म्हणाल्या अरे.! आज काय सूर्य पश्चिमेला उगवला का? काय??? आज अगदी walk ला वगैरे! . सर्व ठीक ना. तब्येत वगैरे •••. काय??? डॉक्टर ने सांगितले की काय??? BP वगैरे ठीक ना. •• अग!! पण असं डोलत डोलत चाललीस तर, काही उपयोग होणार नाही •••. जरा स्पीड वाढव. •• तरच वर्ष सहा महिन्यांत काही फरक पडेल. ••• उद्या पासून माझ्या बरोबर चल. •• छान चार, पाच किलोमीटर चालत चक्कर मारून येत जाऊ•••••
काकूंच्या बोलण्याची speed तर बुलेट ट्रेन च्या speed पेक्षाही जास्त होती.
बाप रे!! एका दमात एवढं सर्व •••..
आमची आई काकूंच्या या लांबलचक भाषणाने घाबरूनच गेली. •••आधीच खूप उत्साह होता ••. त्यात ही अशी भर पडली ••. आणि त्यात तसा स्वभाव. ••• झालं आता, मग काय कारणच मिळाले की मला जमणार नाही म्हणून. •••.
खरंच काही लोक बेफाम सुटतात. •• एवढ्या लांब लचक भाषणा ऐवजी, फक्त एवढं म्हंटल असतं अरे व्वा!! छान वाटलं ग, तुला बघुन. •• चला म्हणजे आता रोज सकाळी आपली भेट होणार. •• सर्व मजेत ना.
एवढं पुरेसं होतं समोरच्याला प्रोत्साहन द्यायला. व स्वतः चा मान टिकवायला. या दोन वाक्यात तुमची काळजी, प्रेम, आधार, आश्चर्य, चौकशी सर्व सामावले असते ••.. देवानें सर्वांना ओठ धनुष्याच्या आकाराचे दिलेले आहेत. पण त्यातून शब्दांचे बाण असे सोडा जे समोरच्या च्या हृदयाला छेद नाही, तर हळुवार स्पर्श करतील. •••. पण प्रतिसाद देणारे कमी व प्रतिक्रिया देणारे नेहमीच जास्त भेटतात •••. जर प्रत्येकाने आपल्या मना बरोबर दुसऱ्या च्या मनाचाही विचार केला तर असं होणार नाही. थोडे कोमल उत्साह वर्धक शब्द वापरता आले पाहिजे ••••.
काय आणि किती आणि कोणाचे ऐकायचे हे आपण ठरवायचे असते. •• शब्द मनात झिरपू द्यायचे की कानावरूनच परतवून लावायचे. ••• खूप सज्जन व प्रामाणिक राहिले आणि गरजेपेक्षा जास्त लक्ष व वेळ लोकांना दिला तर ते आपल्याला ‘फालतू’ समजतात. ••• गृहित धरतात. •••त्यामुळे प्रत्त्येक वेळी कसा ‘ stand ‘ घ्यायचा हे ठरविता आले पाहिजे. •••.
म्हणतात ना••• विचार filter करता आले पाहिजे. ••
बाबांच्या लक्षात आले, ते म्हणाले, •••अग!! तू आपल्या स्पीड ने चाल. •••कासवाच्या गतीने का होईना रोज थोडी थोडी प्रगती कर. ••अग!! खूप ससे आडवे येतील. ••बस, त्यांच्या कडे दुर्लक्ष करायची हिम्मत ठेव. •••
जेमतेम आठ दिवस झाले तूला सुरवात करून. ••हळूहळू होईल सराव. •• आता त्या काकूंचे ऐकून तू आपले फिरणे बंद करू नकोस. • एवढं disturb व्हायला काय झालं???
प्रत्त्येकाचे काही specific क्षेत्र असते. •• त्यात तो उत्तम असतो ••. जसं तुला स्वयंपाक म्हंटला की तू कशी एकदम उत्साहाने कामाला लागते. ••अगदी पंधरा वीस जणांचे स्वयंपाक करणे, म्हणजे ‘बाएं हात का खेल आहे ‘ तुझ्या करिता. ••••
ते जमत का त्या काकुंना??? नाही ना. ••
एक व्यक्ती सगळ्याच जागी उत्तम कसा असू शकतो.??? अग, हा व्यायाम तुझ्या करिता गरजेचा आहे. •• तुला काय मेराथॉन मधे पन्नास किलोमीटर चालायचे आहे का??? फक्त स्वतः च्या प्रकृती कडे लक्ष दे. •• अग!! आता खूप झाले स्वयंपाक आणि मुलांकडे लक्ष देणे••. आता स्वतः कडे लक्ष दे ••. स्वतः च्या आवडी निवडी जप. ••लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नको. •••
काही जण विचार न करता खूप बोलतात••त्यांच्या कडे दुर्लक्ष करायला शिक. किंवा उत्तर द्यायला शिक. •••
एक फुलपाखरू फक्त चौदा दिवस जीवन जगतो. पण किती बागडत ते. आयुष्याचा पूर्ण आनंद तो त्या तेवढ्या छोट्याशा आयुष्यात घेतो. ••••
तेंव्हा आता आपल्या आयुष्याची दिशा जरा बदल. •• तु आज पर्यंत घरासाठी खूप केले. •• आता स्वतः करिता जग. •• स्वतः च्या प्रकृती ची काळजी घे. •• बाबा पूढे म्हणाले, •••
अग! तुला ही पूर्ण हक्क आहे, आपल्या मनासारखं जगण्याचा. •••शरीर थकलं तरी मन कधीच थकत नाही. मनाला मनसोक्त उडू द्यावे. ••••
प्रत्येक घरात अशी माणसे असावीत. जी एकमेकांचा विचार करतील. ••वेळेवर सावरतील. ••सांभाळतील. •• विचार परिवर्तन आणतील. •• योग्य सल्ला देतील. •• विचारांना दिशा देतील. ••आयुष्य म्हणजे राब राब राबणे नव्हे. ••तर आपापल्या परीने enjoy पण करता आले पाहिजे. •••वेळेवर बोललेले दोन शब्द पूढच्या उद्भवणाऱ्या अनेक प्रश्नांची शक्यता कमी करतात. ••• यालाच योग्य सल्ला देणे, किंवा ‘ counseling’ करणे म्हणतात ••••. प्रत्येकाचा आदर करणे, समंजसपणे वागणे, समजून घेणे, समजावीणे ज्या घरात जमते. त्या घरात सूख -शांती समाधान असते तेच त्यांच्या घरचे वास्तूशास्त्रज्ञ असतात ••. त्यांच्या असण्यानेच. घरात सकारात्मक उर्जा असते. •• विश्वास असतो. ••••
आपण जन्माला आलो आहोत ते गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही, तर उरलेल्या दिवसांचा आनंद व उपभोग घेण्यासाठी. ••यांचे स्मरण असावे. ••••
म्हणतात ना••••
“मार्गदर्शन सही हो तो एक नन्हा-सा दीपक भी किसी सूरज से कम नही “।. ••••
© सुश्री संध्या बेडेकर
वारजे, पुणे.
7507340231
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





