सुश्री संध्या बेडेकर

? मनमंजुषेतून ?

☆ “Success Gracefully सांभाळता आला पाहिजे.” ☆ सुश्री संध्या बेडेकर ☆

काल एक शाळेतला मित्र भेटला. ‘यशवंत जोशी ‘ नाव‌ त्याचे. यशवंत,म्हणजे शाळेपासूनच खूप हुषार,खूप sincere, खूप शांत,नाकाच्या सरळ रेषेत चालणारा, अशी त्याची व्यक्ती रेखा. ••••

पण आज तो खूप मोठा ‘ well known personality ‘आहे. ••••

दर दोन वर्षांत प्रमोशन‌. बुध्दी व आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर कंपनी चा MD झाला. कंपनी ची कार, मोठ्ठं छान आधुनिक सुखसोयी असलेले सुंदर घर, घराच्या गेट वर दोन मोठे ‘ lights ‘जळत असतात. त्यामुळे रात्री देखील ‘यशवंत जोशी’ नावाची ची पाटी दुरून चमकते. दारावर ‘watch man’ पण असतोच. कोणी आल्या वर आधी आत फोन करुन तो येणाऱ्या चे नाव,गाव सांगतो. त्यानंतरच आत प्रवेश मिळतो. घरी बायको व मुलगी. अशी त्याच्या बद्दल ची माहिती कळली होती. एका ‘ high Profile status ‘चे घर. मोठ्या हुददा वर असणार्या माणसाची कल्पना घराच्या बाहेरूनच येते. ••••

आमच्या मित्रमंडळी तर यशवंत च्या प्रगती ची बातमी होतीच. एखाद्याला सोडून बाकी कोणी त्याला collage नंतर भेटलेच नव्हते. त्यामुळे पुढच्या आठवड्यात होणाऱ्या आमच्या. Batch चे ‘get-together ‘ म्हणजे यशवंत जोशी ला भेटायला मिळणार हे, one of the attractions होतेच. ••••

आमच्या Batch चे पन्नास मित्र मैत्रिणी आम्ही एकत्र जमणार होतो. तशी overall आमची Batch हुषार म्हणूनच सर्वांना माहीत होती. 73 Batch,म्हणजे एक वेगळीच Batch, लक्षात राहण्यासारखी. mejority सर्व मुलं well placed आहेत, अशी चर्चा शाळेत नेहमी होत असे. ••••

73 Batch चे Get-together एक मोठा ‘Event ‘. एक दिवसाचा कार्यक्रम. सुरवात ‘ self introduction ‘ ने झाली. पन्नास वर्षांनंतर सर्व एकमेकांना ओळखायचा प्रयत्न करत होते. काही छान ‘well maintained ‘, तर काहींच्या चेहऱ्यावर वय दिसत होते. ••••

प्रत्त्येक जण जून्या आठवणी,नवीन भेट यांचा ताळमेळ जमविण्याचा प्रयत्न करत आहे,असं वाटत होत. •••••

थोडक्यात सर्वांनी आपली, आपल्या परिवाराची माहिती व आता पर्यंत च्या

आयुष्याचे प्रगती पुस्तक वाचले/ सांगितले. सर्व आनंदात, उत्साहात व तयारीत आलेले दिसत होते. आता यशवंत जोशी ओळख देणार होता. सर्वांच्या चेहऱ्यावर संमिश्र भाव होते. काय सांगतो??? किती सांगतो???? कसं सांगतो??? यावर सर्वांचे लक्ष होते. यशवंत ने त्याचा आजपर्यंत चा प्रवास अगदी सहज सांगीतला. कुठे ही ‘ मी कोणीतरी खास ‘ असा भाव नव्हता. सर्वांना हायसे झाले. आपला मित्र अजूनही तसाच आहे, बघून छान वाटले. नाही तर अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणारे खूप लोक आतापर्यंत बघीतले होते. ••••

पूर्ण दिवस गप्पांत गेला. कोणी कसा मार खाल्ला होता,आणि कोणामुळे मार मिळाला होता. ह्या गोष्टी तर खूपच रंगल्या. सर्व हसुन हसुन ‘ recharge ‘झाले.

संध्याकाळी,शाळेतल्या बारावी च्या Batch बरोबर एक Tea Party होती. विद्यार्थ्यांना भेटायचा कार्यक्रम होता. अर्थातच मुलांचे जास्त लक्ष यशवंत जोशी कडेच होते. त्यांनी त्याचे फोटो वर्तमानपत्रात बघीतले होते. व TV वर त्याच्या मुलाखती बघीतल्या व ऐकल्या होत्या. प्राध्यापकांनी यशवंत ला स्टेज वर येऊन बोलायची विनंती केली. ••••

यशवंत स्टेजवर गेला. व त्याने सर्वप्रथम शाळेचे आभार मानले.

तो म्हणतो,••• माझ्या या प्रवासात शाळेचा खूप मोठा वाटा आहे. मला शाळेने मेहनत करायला शिकवले. त्या वेळेस ‘संत सर ‘ नेहमी म्हणायचे,•••

” तो माझ्या पूढे कसा गेला??? असा विचार करण्यापेक्षा, मी मागे का राहिलो???

याचा विचार करा व त्यावर काम करा. आपला वेळ व energy दुसऱ्याला मागे ओढण्यात वाया घालवू नका. तुम्हाला जर प्रगती करायची असेल तर जास्त काम करावेच लागेल. दोन पुस्तके extra वाचावीच लागतील.. हे संत सरांचे उपदेश

” are the key words for success. ” Regular, consistent hardwork, time management and dedication कामाचा sequence / priority जर तुम्हाला ठरविता आली, तर तुम्ही सर्व कामे वेळेत व वेळेवर करू शकता.

सर्वांनाच चोवीस तास मिळतात. ••••

हुषार खूप लोक असतात. माझ्या बरोबर ही माझ्या पेक्षा जास्त हुशार मुले होती. पण मेहनत करणे,हा गुण तुम्हाला पूढे नेतो. तुम्हाला तुमच्या ‘comfort zone ‘मधून बाहेर निघावे लागेल. व आपल्या कामाकडे पूर्ण लक्ष द्यावे लागेल. जेव्हा तुम्ही काम करता,तेव्हा अडथळे येतातच,पण न घाबरता प्रामाणिकपणे काम करत राहिल्यास मार्ग नक्की मिळतो‌. सर्वांना बरोबर घेऊन काम केल्यास मदतही मिळते व आपल्याला शिकायलाही मिळतं. ••••

शिक्षण कधीच पूर्ण होत नसत. ••••

all the best तुमच्या परिक्षेकरीता. खूप अभ्यास करा. खूप मोठे व्हा. आणि मुख्य म्हणजे चांगले नागरिक व्हा. ••••

सर्वांना धन्यवाद म्हणुन यशवंतने प्राचार्यांना शाळेकरिता एक चेक दिला. ••••

कार्यक्रम संपला होता. यशवंत आमच्या सगळ्यांत वेगळाच होता. ते वेगळेपण त्याने टिकवले होते. यशवंतबद्दलचा सर्वाचा आदर वाढला होता. ••••

म्हणतात ना,••••

“फळांनी लदलेले झाड नेहमी झुकलेले असते. ” ••••••

© सुश्री संध्या बेडेकर 

वारजे, पुणे. 

7507340231

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted