श्री सुधीर करंदीकर

? मनमंजुषेतून ?

☆  जो आवडतो सर्वांना… ☆ श्री सुधीर करंदीकर ☆

नवरात्र उत्सवाचा आपण सगळेजण मस्त आनंद घेत आहोत. सगळीकडे आनंदी आनंद असे वातावरण आहे.

जाणकार मंडळी असं सांगतात, की आपण देवी देवतांचे दर्शन घेतो / पूजन करतो, प्रसाद ग्रहण करतो, निरनिराळ्या देवस्थानांना भेटी देतो, त्यामुळे आपलं मन आनंदी होतं, मन प्रसन्न राहतं, मनात उत्साह संचारतो, आणि घराघरांमध्ये आनंदी वातावरण असते.

साधुसंत मंडळी असं सांगतात, की देवी देवतांची आपल्यावर कायम कृपादृष्टी असावी, त्यांचे आशीर्वाद आपल्याला सतत मिळावेत, याकरता मात्र अजून काहीतरी वेगळं करायला पाहिजे,

आणि ते काय आहे… ,

त्याबद्दल संत महात्मे सांगतात –

“जो आवडतो सर्वांना, तोचि आवडे देवीला / तोची आवडे देवाला. “

आणि त्याकरता आपण काय करायला पाहिजे, याची त्यांनी दिलेली अगदी सोपी अशी पंचसूत्री अशी आहे –

१) आपल्या मनात कायम गोडवा असावा – आपल्या बोलण्यात कायम गोडवा असावा,

२) आपल्या बोलण्यात नेहमी आदर असावा- आपल्या वागण्यात नेहमी आदर असावा,

३) आपल्या बोलण्यात नेहमी नम्रभाव असावा – आपल्या वागण्यात नेहमी नम्रता असावी,

४) आपण बोलताना आपल्या चेहऱ्यावर कायम आनंद असावा – आपल्या बोलण्यामुळे समोरच्याच्या चेहऱ्यावर नेहमी आनंद यावा,

५) गण गण गणात बोते – आपण स्वतःमध्ये नेहमी देव बघावा – समोरच्यांमध्ये पण आपण नेहमी देव बघावा.

… आणि ही पंचसूत्री आचरणात आणण्याकरता सध्या खूपच छान मूहूर्त सुरू आहे.

 © श्री सुधीर करंदीकर

मो. 9225631100 – ईमेल – srkarandikar@gmail. com

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted