सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # २८१ ?

☆ अभिनेत्री… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

अभिनेत्री ज्योती चांदेकर!

(दुःखद निधन– १६ ऑगस्ट २०२५)

☆ (एक स्फुट) ☆

तिची माझी ओळख एका व्हाॅटस अॅप ग्रुप वर ची,

म्हटलं,  “मी तुमची फॅन आहे, “!

“फॅन नी आपलं नाव सांगायचं असतं,”

मी नाव सांगितलं!

पुढे तिचा खूप सुंदर सिनेमा पाहिला,

मी सिंधुताई…..

आणि रंगत संगतला,

‘आदर्श आई ‘ पुरस्कारासाठी–

तिचं नाव सुचवलं!

आणि तेव्हापासून मैत्र जुळलं!

 

समजलं—-

भांडारकर रोड वरच्या,

बालशिक्षण मंदिरची

विद्यार्थीनी ती पण,

म्हणून बालमैत्रीणी!

 

तिचे पती गेल्यावर,

पाठवला व्हाॅटस अॅप वर

श्रद्धांजली संदेश,

 तेव्हा तिचाच फोन आला,

“तुला मला भेटावंस नाही वाटत का गं”!

 आणि तेव्हापासून–

“तुमने पुकारा और हम चले आए…”

अशी मैत्री !

वैशाली, वाडेश्वर,आमराई—

वरच्या भेटी गाठी,

तिच्या नाटकाच्या तालमींना,

नाटकांना जाणं !

 आंबेजोगाई संमेलन,

ती प्रमुख पाहुणी असलेलं,

मुंबईतला तिच्या नातेवाईकांचा,

लग्न समारंभ,

तिचा प्रत्येक जन्मदिवस,

आणि वर्षा अखेर चा दिवस,

खूप छान साजरे केले…

नंतर अचानक पडलेला,

अंतराय…..

जुलै मधे मी फोन केला तेव्हा म्हणाली होती,

ऑगस्ट मधे येतेय, कधी ते नक्की नाही,

रोजचं गुड मॉर्निंग,

गुड नाईट येत होतं….११ ऑगस्ट पर्यंत,

एक ब्रीफ सीझन….क्वालिटी टाईम,

एक मैत्रपर्व,

आयुष्याच्या पुस्तकात कैद,

कायमचंच!

© प्रभा सोनवणे

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार

पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- sonawane.prabha@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments