सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # २८२ ?

☆ आठवणी… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

कुठून , कुठून, कशा ,कशा,

येतातच आठवणी,

काय कमावलं आणि

काय गमावलं ?

हे हिशोब लावणं सोडून दिलंय मी !

आता डोळे पैलतीरावर…

आणि शेवट गोड व्हावा,

हेच घोकतेय!

काही गोष्टी आजही,

अनाकलनीय आणि गुढच!

आयुष्य,

म्हणता म्हणता,

सरकलं पुढे—-

भूतकाळात रमू नये फार आणि,

भविष्यकाळाची चिंता न करता,

वर्तमानात जगावं म्हणतात,

पण आठवणी—

नाही सोडत पिच्छा!

 

 सांजवेळ कातर होत जातेय,

नाठाळ आठवणींचा पिंगा,

मनभर—

वर्तमानाचा विसर पाडणारा !

© प्रभा सोनवणे

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार

पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- sonawane.prabha@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments