सुश्री वैशाली पंडित

? विविधा ?

☆ ज्येटारू – भाग – १ ☆ सुश्री वैशाली पंडित 

ज्येटारू… (१) ज्येष्ठांचे टाईमपास रूदन

नाहीतर काय ? एकतर ज्येष्ठांना दुसरे उद्योग नसतात काही आणि सगळ्यात वेचून वेचून चुका काढत बसायचं. कोणाला वेळ असतो तुमचं ऐकायला ?

माझ्यावरूनच सांगतेय मी.

सकाळी दहाच्या बातम्या महाराष्ट्र की काय अशा न्यूज चॕनेलवर बघत होते.

निवेदिका शक्य तेवढ्या कडक आवाजात बातम्या सांगत होती.

शासकीय रूग्णालयात रूग्णांना आहार पुरवण्यात येणार असल्याची योजना सरकारतर्फे जाहीर झाली होती. आणि त्यावर

“एकही रूग्ण यापुढे कुपोषणापासून वंचित राहू नये अशी काळजी सरकार घेणार आहे. ” असेही तिने जोरात सांगितले.

मी गरगरलेच.

चॕनेलांवरची अभिजात मराठी किती वंचित आहे याची उदाहरणं अनेक मिळतात. पण रूग्ण कुपोषणापासून वंचित राहणार नाही या सरकारी योजनेने माझ्या पोटात गोळा उठला.

असो. म्हटलं ना, शेवटी हे ज्येटारू (ज्येष्ठांचे टाईमपास रूदन)

©   सुश्री वैशाली पंडित

मालवण, जि. सिंधुदुर्ग, मो. ९४२२०४३०२५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted