सुश्री वैशाली पंडित
विविधा
☆ ज्येटारू – भाग – २ ☆ सुश्री वैशाली पंडित ☆
ज्ये टा रू नंबर २
आंतरराष्ट्रीय महिलादिन.शासकीयच.
मुख्यमंत्री आणि त्यांचा लवाजमा कार्यक्रमस्थळावर पोचतो. रितीप्रमाणे राष्ट्रगीताला आणि राज्यगीताला मुख्यमंत्र्यांसह स्तब्ध ताठ उभे राहतात.मुख्यमंत्री तर दोन्ही गीतं स्वतःही म्हणतांना दिसतात.
अपवाद फोटोग्राफर्सचा.
इकडे राष्ट्रगीत सुरू आहे आणि तिकडे सगळे फोटोग्राफर उभे आडवे मेरे धरत फोटो काढतायत.अरे राष्ट्रगीताला उभे राहिले याचे फोटो कशाला ? आणि तुम्ही भारतीय नागरिक नाही आहात का ? राष्ट्र राज्यगीताला उभं राहणं,मान देणं हे तुमचं कर्तव्य नाहीये का ? नंतर काढा की फोटो जीव जाईस्तो.
त्या फोटोग्राफर्सना कोणीही कसं सांगितलं नसेल?
असो.
शेवटी हे ज्येटारूच.
© सुश्री वैशाली पंडित
मालवण, जि. सिंधुदुर्ग, मो. ९४२२०४३०२५
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





