सूचना/Information 

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

श्री राजीव पुजारी

🎇अ भि नं द न 🎇

आपल्या समूहातील ज्येष्ठ लेखक श्री. राजीव पुजारी त्यांच्या लेखनातून आपल्या वाचकांना नेहेमीच नवनवी उत्तम आणि आवश्यक अशी वैज्ञानिक माहिती देत असतात हे सर्वश्रुत आहे. आणि आता श्री. पुजारी यांना नुकताच त्यांच्या ‘अंतराळवेध’ या पुस्तकासाठी “ महामृत्युंजय वाड. मय पुरस्कार “ जाहीर झाला आहे. गडचिरोली येथील नाट्यश्री कलामंचातर्फे हा प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय महामृत्युंजय वाड•मय पुरस्कार राजीव पुजारी यांना दिला जात आहे. क्राउन पब्लिकेशन्स यांनी हे पुस्तक प्रकाशित केले आहे. इतका महत्वपूर्ण पुरस्कार मिळाल्याबद्दल श्री. राजीव पुजारी यांचे सर्व थरांतून कौतुक होत आहे.

हे पुस्तक अवकाश विज्ञानाला वाहिलेले असून, पुस्तकात नासा व इस्रो द्वारा राबविण्यात आलेल्या विविध अंतरिक्ष मोहिमांचा समावेश आहे. दहा लेखांचा समावेश असलेला एक विशेष विभाग म्हणजे NASA च्या मार्स २०२० मोहिमेला समर्पित आहे. याशिवाय LCRD, IXPE, DART, LUCY, जेम्स वेब अंतरिक्ष दुर्बीण, आर्टिमिस योजना, चंद्रयान-३, गुरुत्वाकर्षण लहरी, आदित्य-एल १, नासाची मंगळ ग्रहावरील मातीचे नमुने परत आणायची मोहीम, इत्यादी मोहिमांवर अभ्यासपूर्ण लेख आहेत.

…. या सोबतच दोन रंजक अंतराळ कथा आहेत.

…. शेवटचा विभाग संशोधक व संशोधन संस्था या संबंधी आहे. यामध्ये डॉ. विक्रम साराभाई, प्रो. यू. आर. राव, के. कस्तुरी रंगन, एम. जी. के. मेनन, डॉ. सतीश धवन यांचेविषयी माहिती आहे.

…. याच विभागात इस्रो व तिच्या विविध केंद्रांची माहिती आहे.

आधुनिक आणि अद्ययावत अशी विज्ञान विषयक आवश्यक माहिती सर्वसामान्य वाचकांना सहज आकलन होईल अशा पद्धतीने लिहिणे हे श्री. पुजारी यांचे वैशिष्ट्य आहे. आणि एक प्रकारे हे समाज-प्रबोधनाचेच काम आहे यात दुमत नाही.

आपल्या अभिव्यक्ती परिवाराकडून श्री. राजीव पुजारी यांचे मनःपूर्वक अभिनंदन, आणि त्यांच्या यापुढील अशाच यशस्वी आणि वैज्ञानिक माहितीपर उत्तम लिखाणासाठी असंख्य शुभेच्छा.

– संपादक मंडळ

ई अभिव्यक्ती मराठी

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments