सूचना/Information
(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)
☆ डॉ. सोनिया कस्तुरे ☆
🎇अ भि नं द न 🎇
आपल्या समूहातील प्रसिद्ध लेखिका / कवयित्री डॉ. सोनिया कस्तुरे यांच्या “पिंपळायन” आणि “हसरे किनारे” या दोन कविता संग्रहांचे प्रकाशन नुकतेच लोकायत प्रकाशन सातारा, यांच्या वतीने, आणि ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे सर यांच्या हस्ते करण्यात आले आहे.
… आपल्या सर्वांच्या वतीने डॉ. सोनिया यांचे हार्दिक अभिनंदन.
डॉ. सोनिया यांचे अभिनंदनास्पद आणखी एक यश म्हणजे या त्यांच्या दोन कवितासंग्रहांपैकी “हसरे किनारे” या संग्रहाला ‘मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ अनुदानित’…
“राज्यस्तरीय माणगंगा साहित्यप्रेमी गौरव पुरस्कार” हा मानाचा पुरस्कार देण्यात आला आहे.
आपल्या सर्वांतर्फे या पुरस्काराबद्दल डॉ. सोनिया कस्तुरे यांचे अतिशय मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील अशाच दमदार आणि यशस्वी साहित्यिक वाटचालीसाठी असंख्य हार्दिक शुभेच्छा.
आजच्या अंकात वाचूया या पुरस्कारप्राप्त संग्रहातील वेगळ्या विषयावरची एक कविता.
– संपादक मंडळ
ई अभिव्यक्ती मराठी
☆ ☆ ☆ ☆ ☆
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈







