सूचना/Information
(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)
☆ डॉ. सोनिया कस्तुरे ☆
🎇अ भि नं द न 🎇
स्व. आ. डॉ. आप्पासाहेब ऊर्फ सा. रे. पाटील स्मृती अखिल भारतीय मराठी कथा स्पर्धा २०२६ नुकतीच आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेला देशभरातून खूप उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला, आणि आपल्या समूहासाठी आनंदाची गोष्ट म्हणजे आपल्या सदस्या डॉ. सोनिया कस्तुरे यांच्या कथेला या स्पर्धेत “ विशेष उल्लेखनीय कथा “ हा पुरस्कार प्राप्त झाला आहे.
या पुरस्काराबद्दल आपल्या सर्वांतर्फे डॉ. सोनिया यांचे अगदी मनःपूर्वक अभिनंदन आणि यापुढील त्यांच्या अशाच यशस्वी साहित्यिक वाटचालीसाठी असंख्य हार्दिक शुभेच्छा.
आजच्या ‘जीवनरंग ‘ सदरात वाचूया त्यांची “पालवी “ ही पुरस्कार प्राप्त कथा.
– संपादक मंडळ
ई अभिव्यक्ती मराठी
☆ ☆ ☆ ☆ ☆
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





