सूचना/Information
(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)
श्री हेमंत बावनकर
🎇अ भि नं द न 🎇
दीपावलीचा आनंद द्विगुणित करणारी एक आनंददायी बातमी
ई-अभिव्यक्ती ऑनलाईन साहित्य मंचचे मुख्य संपादक श्री.हेमंतजी बावनकर यांनी प्रदीर्घ काळ हिंदी साहित्य लेखन व हिंदी साहित्य सेवा करुन स्वतःचा ठसा उमटवला आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन, युवा उत्कर्ष साहित्यिक मंच व महाराजा हरिश्चंद्र स्नातकोत्तर महाविद्यालय, मुरादाबाद,उत्तर प्रदेश,यांनी सन २०२५ चा डॉ.विश्व अवतार जैमिनी युवा उत्कर्ष साहित्य कमल सन्मान श्री. हेमंतजी बावनकर यांना प्रदान केला आहे.
या कौतुकास्पद सन्मानाचा ई-अभिव्यक्ती परिवाराला अभिमान वाटात आहे. ई-अभिव्यक्ती परिवारातर्फे श्री.बावनकर यांचे मन:पूर्वक अभिनंदन ! साहित्य क्षेत्रातील त्यांचे कार्य असेच बहरत राहो ही सदिच्छा !
संपादक मंडळ
ई अभिव्यक्ती मराठी
☆ ☆ ☆ ☆ ☆






आपका बहुत अभिनंदन हेमंत जी यह पुरस्कार पाने के लिए