सूचना/Information
(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)
डॉ. शैलजा करोडे
💐 अ भि नं द न 💐
आपल्या समूहातील ज्येष्ठ लेखिका / कवयित्री सुश्री डॉ. शैलजा करोडे यांना “ दिशा महाराष्ट्राची “ या यू ट्यूब चॅनेलप्रस्तुत साहित्य संमेलनात “ साहित्य भूषण – २०२६ “ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
– – त्यांच्या प्रदीर्घ साहित्य सेवेसाठी त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. शैलजा करोडे यांची नुकतीच — 1) माणुसकी—कथासंग्रह, 2) हुंकार काळजाचा—कवितासंग्रह, आणि 3)निशिगंध —ललित लेख संग्रह — अशी तीन पुस्तके प्रकाशित झालेली असून, आतापर्यंत त्यांची एकूण 26 पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. समाजाच्या सर्व स्तरातून शैलजा करोडे यांचे अभिनंदन होत आहे.
आपल्या सर्वांतर्फे शैलजाताईंचे मनःपूर्वक खूप अभिनंदन, आणि पुढील अशाच यशस्वी साहित्य सेवेसाठी असंख्य हार्दिक शुभेच्छा. 💐💐
आजच्या “ जीवनरंग “ सदरात वाचूया त्यांची एक कथा.
संपादक मंडळ
ई अभिव्यक्ती मराठी
☆ ☆ ☆ ☆ ☆
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





