सूचना/Information 

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

सुश्री सुरेखा चिखलकर

💐 अ भि नं द न ! अ भि नं द न !! हार्दिक अभिनंदन!!!💐

आपल्या समूहातील सुपरिचित लेखिका आणि कवयित्री सुश्री सुरेखा चिखलकर यांना नुकतेच ‘भारत गौरव एक्सलन्स अवॉर्ड २०२६’ या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

जिवरान फाऊंडेशनच्या वतीने हा पुरस्कार देण्यात आला आहे. सामाजिक कार्यकर्त्या, कवयित्री व लेखिका असणाऱ्या सुरेखाताईंना समाजसेवा, मराठी साहित्य, काव्य, महिला सशक्तीकरण आणि समाजकल्याण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

हा पुरस्कार “EXCLUSIVE GLOBAL HONOUR“ समजला जातो.

इतक्या तरुण वयात इतका मोठा सन्मान मिळणं ही खरोखरच अतिशय कौतुकास्पद गोष्ट आहे. या पुरस्कारासाठी त्यांची निवड होण्यामागची कारणे आणि या निर्णयाबाबतचे निकष या बद्दल हा पुरस्कार देणाऱ्या जिवरान फाऊंडेशनच्या शब्दात थोडक्यात सांगायचे तर – – 

चिखलकर या गेल्या १५ वर्षांपासून समाजसेवेत कार्यरत आहेत. शारीरिक अडचणींवर मात करून त्यांनी साहित्य आणि समाजसेवेची आवड जोपासली आहे. बेघर व्यक्ती, मानसिक आरोग्याच्या समस्येने ग्रस्त लोक, वंचित समाज तसेच गरजू व गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी त्या ‘आपली माणसं फाऊंडेशन, इस्लामपूर’ च्या माध्यमातून व वैयक्तिक पातळीवर सातत्याने कार्य करत आहेत. दत्तक योजनेतून विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत व अन्नधान्य सहाय्य करण्याचे कार्यही त्यांनी केले आहे.

मराठी साहित्यातही त्यांचे मोठे योगदान आहे. ‘भक्ती सागर’, ‘नारी शक्ती’, ‘नक्षत्र’, ‘लाडकी लेक’, ‘जिर्ण काया’ यांसारख्या अनेक कविता संग्रहात त्यांच्या ५४ हून अधिक कविता प्रकाशित झाल्या आहेत. स्टोरी मिरर व्यासपीठावर त्यांच्या कविता प्रसिद्ध झाल्या असून, विविध साहित्यिक उपक्रम व व्हॉट्सॲप साहित्य समूहांच्या माध्यमातून २५० हून अधिक कविता सादर केल्या आहेत. त्यांचा ‘अंकुरित आभाळ’ हा कविता संग्रह दि. ३१ जानेवारी २०२६ रोजी प्रकाशित झाला आहे.

याशिवाय सुमारे २० साहित्य संमेलनांमध्ये त्यांनी सहभाग घेतला असून, कवि संमेलनाच्या अध्यक्षपदाची जबाबदारीही त्यांनी सांभाळली आहे. शैक्षणिक व सामाजिक कार्यक्रमांमध्ये कवयित्री व प्रमुख पाहुण्या म्हणून त्यांना निमंत्रित केले जाते.

– – आणि त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना हा सन्मान देण्यात आला आहे.

… आपल्या सर्वांतर्फे सुरेखाताईंचे अतिशय मनःपूर्वक अभिनंदन.. आणि त्यांची ही वेगळ्या वाटेवरची वाटचाल यापुढेही अधिकाधिक जोमाने आणि अशीच उत्तमरित्या यशस्वी होत राहो यासाठी खूप खूप शुभेच्छा.

संपादक मंडळ

ई अभिव्यक्ती मराठी

☆ ☆ ☆ ☆ ☆

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted