सूचना/Information 

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

? सुश्री संगीता कुलकर्णी  – अभिनंदन ?

💐 संपादकीय निवेदन 💐

आपल्या समूहातील ज्येष्ठ कवयित्री व लेखिका सुश्री संगीता कुलकर्णी यांना नुकताच सर्वद फाउंडेशन, मुंबई यांच्यातर्फे “सर्वद स्टार उत्कृष्ट साहित्यिका” हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

सर्वद फाउंडेशन, मुंबई ही संस्था मराठी भाषा आणि मराठी संस्कृती-संवर्धन या ध्येयाने कार्यरत असून, या ध्येयाशी निगडीत अनेक कामे या संस्थेमार्फत केली जातात, ज्या अंतर्गत राज्यस्तरीय साहित्य संमेलनही आयोजित केले जाते. या संस्थेतर्फे संगीताताईंना हा मानाचा पुरस्कार मिळणे ही खरोखरच कौतुकास्पद गोष्ट आहे.

 तसेच “ठाण्याचे विचारदीप” या पुस्तकात त्यांचा साहित्य प्रवास उलगडणारा विशेष लेखही प्रकाशित केला गेला आहे ही सुद्धा अभिनंदनीय गोष्ट आहे.

ई अभिव्यक्ती समूहातर्फे संगीताताईंचे मनःपूर्वक अभिनंदन आणि साहित्य क्षेत्रातली त्यांची वाटचाल उत्तरोत्तर अशीच यशस्वी होत राहो या आपल्या सर्वांतर्फे त्यांना हार्दिक शुभेच्छा. ?

आजच्या ‘ मनमंजुषा ‘ सदरात वाचू या कवितेविषयीचे त्यांचे विचार.

संपादक मंडळ, ई-अभिव्यक्ती (मराठी)

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
5 1 vote
Article Rating
Subscribe
Notify of
guest

1 Comment
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Vishal

प्रशंसनीय!!!