सुश्री ज्योति हसबनीस

(“Kadamb” is one of the best poems of Ms. Jyoti Hasabanis ji. This poem is in two parts.  Tomorrow, we will publish second part of the poem. 

You can feel her emotions.  In her own words –

I like the aura of that tree as it reminds me of the Krishna – Leela ! 
Its bloom time is Shrawan . 
I used to visit the tree in that period every year and witness the divine beauty n fragrance !)
?  *कदंब काव्य*१ ?
आषाढ सर कोसळली
श्रावण सर उजळली
नवचैतन्याने हिरवळली
तृप्त धरा नव्हाळली  ।
नव्या नव्हाळीचा
साज वसुंधरेला
नव नवोन्मेषाचे
कौतुकओझे तरूवेलीला
नवोन्मेषाच्या कौतुकात
सृष्टी रंगली
निसर्गाची वत्सल नजर
कदंबावर पडली
इवल्या इवल्या जिवांची
आस मनी होती
‘त्याच्या’ परिसस्पर्शाचीच
मात्र खोटी होती
लाभला परिसस्पर्श ,
चमत्कार झाला
हिरव्या पर्णसंभारातून ,
इवला जीव डोकावला ।
दिसामागून दिस ,
जाऊ लागले
कदंबाचे झाड ,
लेकुरवाळे झाले ।
वा-यासंगे झुलू लागले ,
मजेत जीव सानुले कोवळे
फांदी फांदी रंगू लागले ,
लपंडावाचे खेळ आगळे ।
झुलत मस्तीत ,
जीव ते बहरले
लेवून शुभ्र साज ,
अंगांगी मोहरले ।
शुभ्र साज त्यांचा ,
सोनपिवळ्या छायेतला
अलौकिक गंध त्यांचा ,
परिसरांस व्यापलेला ।
मोहरलेला कदंब आणि
बहरलेली रासलीला
अद्वैताचा बंध रेशमी
कदंब होता साक्षीला ।
तोच श्रावण तोच बहर ,
पण नाही मधुर बन्सीधून
तोच ध्यास तीच आस
पण नाही अधीर मीलन ।
मन वेडे कदंबाचे,
खुळे कान्ह्याच्या पदरवाचे
मन वेडे कदंबाचे ,
 पिसे गोपिकांच्या पैंजणांचे ।
सावळ्यासाठी आसावत
तृषित कदंब उभा
वैभव आपुले सावरीत
अदबीत कदंब उभा ।
© ज्योति हसबनीस
image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

1 Comment
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
दीपक खेर

छान कविता साठी अभिनंदन